Ram Mandir : राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. रामजींच्या अयोध्येत आगमनानंतर हॉस्पिटॅलिटी , प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला मोठी (Ram Mandir) चालना मिळणार आहे. 22 जानेवारीपासून मंदिरात भाविकांच्या रांगा लागणार आहेत. रामजींच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतील. यातून अयोध्येच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची आशा आहे. राम मंदिरात दर्शन सुरू झाल्यानंतर सुमारे 20,000 नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यशब गिरी, मुख्य वाणिज्य अधिकारी, स्टाफिंग आणि रँडस्टॅड टेक्नॉलॉजीज, रँडस्टॅड इंडिया यांनी सांगितले की, अयोध्या येत्या काही वर्षांत दररोज अंदाजे 3-4 लाख अभ्यागतांसह जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतरित होण्यास तयार आहे. त्यांनी म्हटले आहे की पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे निवास आणि प्रवासाच्या मागणीत आधीच लक्षणीय वाढ झाली आहे. अयोध्येतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात (Ram Mandir) मोठी वाढ होताना दिसत आहे.
20 ते 25 हजार रोजगार निर्माण होतील
रँडस्टॅड ने म्हंटले आहे की , 20,000-25,000 कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्याची संख्या दरवर्षी वाढत आहे. हॉटेल कर्मचारी, हाउसकीपिंग, फ्रंट डेस्क व्यवस्थापन, बहुभाषिक मार्गदर्शक आणि इतर अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
6 महिन्यात निर्माण झाल्या नोकऱ्या
टीमलीजचे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, गेल्या 6 महिन्यांत किमान 10,000 नोकऱ्या आणि 20,000 पदे निर्माण झाली आहेत. यामध्ये हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांचा समावेश आहे. हॉटेल कर्मचारी, स्वयंपाकी, चालक अशा अनेक प्रकारच्या नोकऱ्या निर्माण (Ram Mandir) झाल्या आहेत.
अयोध्येसह अनेक शहरांमध्ये नोकऱ्या वाढतील (Ram Mandir)
हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मते हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये हजारो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी मॅनेजर, रेस्टॉरंट आणि हॉटेल कर्मचारी, लॉजिस्टिक मॅनेजर, ड्रायव्हर इत्यादींसह अनेक प्रकारच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. या नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या पहिल्या सहामाहीत सुरू होण्याची शक्यता आहे. केवळ अयोध्येतच नाही तर लखनौ, कानपूर, गोरखपूर इत्यादी शेजारच्या शहरांमध्येही विकास अपेक्षित आहे. अशी महिना इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.