Ram Mandir Pran Pratishtha । आज अयोध्या येथे राम मंदिराचा (Ram Mandir Ayodhya) भव्य दिव्य उदघाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. विविध पूजा आणि मंत्रोच्चारात ही प्राणप्रतिष्ठापना पार पडली. यावेळी मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यानंतर रामल्लाची पहिली झलक (Shri Ram First Look)सर्वाना पाहायला मिळाली. निरागस चेहरा, स्मित हास्य असलेली श्रीरामाची मूर्ती पाहून तुमचाही ऊर भरून येईल.
ओठांवर स्मित हास्य आणि चेहऱ्यावर अप्रतिम तेज- Ram Mandir Pran Pratishtha
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा Ram Mandir Pran Pratishtha करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. हि शुभ वेळ 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंद इतकी होती, बरोबर याच वेळेत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या मूर्तीची उंची 51 इंच असून कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी राम लल्लाची प्रतिमा साकारली आहे. रामललाच्या डोळ्यात निरागसता, ओठांवर स्मित हास्य आणि चेहऱ्यावर अप्रतिम तेज दिसत आहे. ही मूर्ती पाहून प्रत्येक रामभक्तांना नक्कीच अभिमान वाटेल आणि त्याचा ऊर भरून येईल हे नक्की….
#WATCH | First visuals of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya pic.twitter.com/E0VIhkWu4g
— ANI (@ANI) January 22, 2024
रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली होती. अनेक दिग्गज या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील झाले होते. अयोध्या नगरी सुद्धा चांगलीच सजली असून सर्वत्र जय श्री रामची घोषणाबाजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. संपूर्ण देशात ठिकठिकाणी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.