Ram Mandir Surya Tilak: अद्भुत चमत्कार!! अयोध्येत रामलल्लांना आशीर्वाद देण्यास अवतरले सूर्यदेव; Photo Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज आयोध्यामध्ये (Aayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनानंतर पहिली रामनवमी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानेच राम मंदिरात सूर्य-तिलक (Ram Mandir Surya Tilak) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी ठीक बारा वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लांना तिलक लावला. सुमारे चार मिनिटे सूर्याची किरणे रामलीलाच्या मस्तकावर स्थिर पडली होती. हे दृश्य सर्वात जास्त मनमोहक होते. अशा तऱ्हेने राम मंदिरात सूर्य-तिलक सोहळा पार पडला.

आयोध्येत सुर्य तिलक सोहळा संपन्न (Ram Mandir Surya Tilak)

जानेवारी महिन्यामध्ये आयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मोठमोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. आज या मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदा रामनवमी आयोजित साजरी करण्यात आली. त्यामुळे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. विशेष बाब म्हणजे, आयोध्येत रामलल्लाच्या मस्तकावर पहिला सूर्याभिषेक (Ram Mandir Surya Tilak) झाला. हा प्रसंग पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती.

सध्या सोशल मीडियावर रामलल्लाच्या मस्तकावर झालेल्या सूर्यभिषेकाचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सूर्याची किरणे बरोबर प्रभू श्रीराम यांच्या मस्तकावर (Ram Mandir Surya Tilak) मध्यभागी पडली आहे. महत्वाचे म्हणजे पौराणिक कथेत हो असे सांगितले आहे की, जेव्हा प्रभू श्री राम यांचा जन्म झाला होता, तेव्हा सूर्य देवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिले होते. आज पुन्हा एकदा याच प्रसंगाची पुनरावृत्ती रामनवमीनिमित्त आयोध्येत झाली.

दरम्यान, आयोध्येतील राम मंदिराला विविध तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आले आहे. आयोध्यात असलेल्या तीन मजली राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आहे. या गर्भगृहातील आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने सेटअप तयार करण्यात आला आहे. या सेटअपमुळे मंदिरावर पडणारी सूर्यकिरणे आपोआप गर्भगृहापर्यंत पोहोचतात. या सूर्यकिरणांना लेन्सच्या मदतीने रामलल्लांच्या माथ्यावर फोकस करण्यात आले आहे.