राम मंदिराला पहिल्याच दिवशी मिळाली 3.17 कोटी रुपयांची देणगी; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याच दिवशी राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा देखील पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, राम मंदिर उघडल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी भक्तांनी 3.17 कोटींचे दान (Donation) केले आहे. तर दर्शनासाठी भाविकांंची गर्दी वाढत चालली आहे. याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिली आहे.

3.17 कोटी रुपयांची देणगी

अनिल मिश्रा यांनी म्हटले आहे की, 22 जानेवारी रोजी आयोजित राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी जमवली होती. खास म्हणजे, अभिषेक सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी भाविकांकडून 3. 17 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापनाच्या दिवशी 10 डोनेशन काउंटर उघडले होते. त्यानंतर भाविकांनी डोनेशन काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या माध्यमातून 3.17 कोटी रुपयांचे दान केले आहे.

त्याचबरोबर, एका निवेदनात जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली. तसेच, भरभरून दान देखील केले. दरम्यान, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मंदिराला भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या भाविकांचे व्यवस्थित सोय करण्यात यावी, तसेच त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ट्रस्ट कडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.