… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना तात्काळ मदत मिळाली असती तर ते वाचले असते असं विधान केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, विनायक मेटेंचं अपघाती निधन हे मनाला चटका लावणारं आहे. . ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. महायुती मधेही त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम केलं आहे. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर मदत मिळाली नाही. त्यांना वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर ते वाचू शकले असते. ही अत्यंत गंभीर बाब आहे असे आठवले म्हणाले. मराठा आरक्षणासाठी ते लढले, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही आठवले यांनी म्हंटले.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर विनायक मेटे आणि चालक एकनाथ कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. अपघातानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोन उचलला गेला नाही. एक तास मदत मिळाली नाही. ते तासभर गाडीतच पडून होते. मदतीसाठी अनेकदा विनवणी करून देखील कोणीही गाडी थांबवली नाही,असा गंभीर आरोप कदम यांनी केला.