हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कवी, साहित्यिक वात्रटिकाकार रामदास फुटाणे (Ramdas Futane) यांनीदेखील कवितेच्या माध्यमातून राज्यातील स्थितीवर भाष्य केलं आहे. सध्या राज्यात प्रकल्पांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ नंतर ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. सरकारकडूनदेखील विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यावेळी रामदास फुटाणे (Ramdas Futane) यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे रामदास फुटाणे (Ramdas Futane) यांनी कविता ऐकवली तेव्हा काही राजकीय नेतेही समोर बसले होते. व्हिडीओमध्ये रामदास फुटाणे यांच्या शेजारी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे बसलेले दिसत आहेत. रामदास फुटाणे (Ramdas Futane) यांच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
राज्यातील परिस्थितीवर कवितेतून कवी रामदास फुटाणेंचे भाष्य, ‘50 आमदारांचं पुनर्वसन….' pic.twitter.com/2ldrQp2MYc
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 31, 2022
रामदास फुटाणे (Ramdas Futane) यांची कविता
मिशीला पीळ देत ते म्हणाले,
वेदांतापेक्षाही मोठेमोठे तुमच्याकडे येतील.
प्रदुषणाचे महाराष्ट्रात आणि बाकीचे गुजरातमध्ये जातील.
तेव्हा दाढी खाजवीत हे म्हणाले,
आमच्या दृष्टीने खरंतर हाच खरा संकल्प आहे,
50 आमदारांचं पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय