कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
समाजातील प्रत्येक घटकांने सामाजिक भान जपत काम करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात समाज उपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराने आज शेकडो मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गाैरव उद्दगार कृष्णा- कोयना पतसंस्थेचे चेअरमन अरूण पाटील यांनी काढले.
सुर्ली (ता. कराड) येथील माध्यमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, युवा उद्योजक प्रदिप वेताळ, सचिन पवार, शंकर पाटील, रणजीत वेताळ, दिपक तुपे, राजेंद्र पाटील, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते. कराड तालुक्यातील गरजू शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, समाजातील अनेक विद्यार्थी शालेय साहित्य मिळाले नाही, म्हणून तडजोड करतात. परंतु देशाची पिढी सुशिक्षित, साक्षर होण्यासाठी उच्चशिक्षित होणे गरजेचे आहे. अशावेळी माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराने आज तालुक्यात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन.
रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराकडून शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
रामकृष्ण वेताळ यांच्या मित्र परिवाराकडून कराड तालुक्यातील जागृती अनाथ आश्रम विद्यालय उंब्रज, कालगाव येथे सचिन चव्हाण मित्र परिवारा तर्फे विद्यार्थ्यांना, पाडळी येथे भारतीय जनात पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, अोगलेवाडी येथील आत्माराम विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल व विद्यामंदिर, हजारमाची येथील विद्यालयात, तर सुर्ली येथे सचिन पवार मित्र परिवाराकडून, कामथी येथे राजाराम फुके (सर) यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.