थंडीच्या दिवसात आजारांना करा रामराम ! फक्त आहारात ‘या’ पदार्थाचा वापर करा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sweet Potato Benefits : सध्या हिवाळा असून सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशा वेळी थंडीच्या दिवसात शरिराबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण थंडीच्या दिवसात आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवले पाहिजे.

अशा वेळी तुम्ही स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी आहारात स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे घ्यायला हवे आहे. उकडलेले किंवा भाजलेले रताळे खाल्ल्याशिवाय थंडीचा आनंद अपूर्ण असतो. रताळ्यामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, लोह, जीवनसत्त्वे यांसह अनेक पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात.जाणून घ्या याचे फायदे…

दृष्टी वाढते

कमजोर दृष्टी बळकट करण्यासाठी रताळे खूप फायदेशीर आहे. यात बीटा कॅरोटीन असते जे डोळे मजबूत ठेवण्यासाठी आणि डोळ्यांशी संबंधित आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांची रोषणाई वाढते व तुम्ही या समस्येपासून मुक्त व्हाल.

ब्लड प्रेशर

रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात रताळ्यांचा समावेश करावा. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील व रक्तदाबासंबंधी आजारांपासून तुम्ही मुक्त व्हाल.

हार्ट हेल्थ

शरीरातील हृदय हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. तुम्ही नेहमी याबाबत जागृत राहिले पाहिजे. अशा वेळी रताळ्यामध्ये आढळणारे पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात रताळे घेतले पाहिजे.

मजबूत हाडे

रताळ्यामध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी रताळ्याचे नियमित सेवन करावे. रताळे हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. रताळे रोज खाल्ल्याने शरीराला ऋतुमानातील आजारांपासून दूर राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

वजन कमी होते.

आजकाल वजनवाढ ही खूप मोठी समस्या बनलेली आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी रताळ्याचे सेवन खूप उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात इतर पदार्थ खात नाही. अशा प्रकारे तुम्ही वजन कमी करण्यासाठी रताळ्यांचा आहारात समावेश करा.