Ranji Trophy Final : मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी; विदर्भाचा दणदणीत पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबईने विदर्भाचा पराभव (Mumbai Beat Vidarbha) करत चषक आपल्या नावावर केला. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली तब्बल ८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईने रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. महत्वाची गोष्ट म्हणजे रणजी इतिहासातील मुंबईच्या संघाने जिंकलेली हि ४२ वी ट्रॉफी आहे. देशांतर्गत क्रिकेट मध्ये मुंबईच्या संघाने आपली क्षमतां पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

वानखेडे स्टेडियमवर पार पड्लेलूया या अंतिम सामन्यात (Ranji Trophy Final) मुंबईने पहिला डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मात्र मुंबईने दमदार फलदांजी करत ४१८ धावा बनवल्या आणि विदर्भाला विजयासाठी तब्बल 538 धावांचे डोंगराएवढं आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ विदर्भाच्या संघाने 133 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी टिच्चून फलंदाजी करत मुंबईला दमवलं. दोघांच्यात पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी झाली. मुशीर खानने नायरला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.

तनुष कोटियनने घेतले ४ बळी – (Ranji Trophy Final)

करुण नायर बाद झाल्यानंतर अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. मात्र हर्ष दुबेची विकेट जाताच विदर्भाचा डाव पुन्हा एकदा कोसळला आणि मुंबईने १६९ धावांनी विजय मिळवला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने १०२ धावांची शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याच्याव्यतिरिक्त करून नायर ७४ आणि हर्ष दुबे याने ६५ धावा केल्या. मुंबईकडून तनुष कोटियनने ४ तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.