भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादामुळे भाजपकडून राहुल गांधीचे सदस्यत्व रद्द; रणजीतसिंह देशमुखांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशभर ‘भारत जोडो’ अभियानातून उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळेच भाजपने राहुल गांधी यांचे लोकसभा सभासदत्व रद्द केले, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख यांनी केला आहे.

खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोल्ट होते. यावेळी वडूज येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीत सिंह देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, परेश जाधव, राहुल सजगणे, अभय कुमार, देशमुख, इम्रान बागवान, डॉ. महेश गुरव, अमरजीत कांबळे, आनंदा साठे, सदाशिव खाडे, सत्यवान कमाने, अभिजीत साबळे, विजयकुमार शिंदे, अँड संदीप सजगने आदी उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, वडूज बस स्थानक ते खटाव तहसील कार्यालय दरम्यान रॅली काढून राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सोमवारी, दि.२७ मार्च रोजी आंदोलन करणार आहे. इंग्रजांविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते लढले आहेत. ज्या राहुल गांधींच्या कुटुंबातील दहशतवादाच्या विरोधात रस्त्यावर रक्त सांडले. आज त्याच कुटुंबातील राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. सुरत न्यायालयाने ती वर्षाची शिक्षा सुनावली. त्यावर आपिल करण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली आहे. मात्र याचा कोणताही विचार नकरता मोदी सरकारने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामुळे राहुल यांच्यावर अन्याय झाल्याची भावना देशभर पसरली आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.