स्वातंत्र्यवीर सावरकर अंधश्रद्धा अन् अस्पृश्यताविरोधी होते; भाजप खासदाराचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फलटण तालुका व शहर भाजपच्या वतीने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वातंत्रवीर सावरकर याच्याबद्दल एक मोठे विधान केले. “विज्ञानवादी, क्रांतिकारक, समाजवादी विचारांचे आणि अंधश्रद्धा व अस्पृश्यता या विरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर होते. हे फार कमी लोकांना माहिती असून, सावरकरांची साधना व स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे कार्य फार महान आहे, असे खा. निंबाळकर यांनी म्हंटले.

फलटण येथे गौरव यात्रा स्वागत व जनप्रबोधन सभा पार पडली. यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक विचार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी सावरकर यांचे जीवन चरित्र व त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनसुद्धा आपल्या राष्ट्रभक्तीच्या विचारापासून ते कधीही परावृत्त झाले नाहीत. त्यांनी केलेले लेखन व लिहिलेली समरगीते आजही आपल्या मनामध्ये चैतन्य निर्माण करतात..

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बाळासाहेब भोसले, धनंजय साळुंखे -पाटील, अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, प्रा. रवींद्र कोकरे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळक आदी उपस्थित होते.