रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना (ranjitsinh disley guruji) नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा ‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डिसले गुरुजी (ranjitsinh disley guruji) यांना जाहीर करण्यात आला आहे. रणजित सिंह डिसले गुरूजींनी (ranjitsinh disley guruji) ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली.

काय म्हणाले डिसले गुरूजी
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, असे आदरणीय डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. यादरम्यान काही दिवसांपूर्वी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले (ranjitsinh disley guruji) यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

2021 मध्ये अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर
अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले (ranjitsinh disley guruji) यांना जाहीर झाली होती. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली होती.त्यामध्ये रणजित सिंह डिसले गुरूजींचा (ranjitsinh disley guruji) समावेश होता. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम डिसले गुरुजी करत आहेत. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर