धक्कादायक !! धावत्या बसमध्ये किन्नर कडून तरुणीवर बलात्कार; गोंदियाहून पुण्याकडे येताना घडला प्रकार

bus Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एका खाजगी बस मध्ये किन्नरकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या बसमध्ये चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी एक तरुणी गोंदियाहून पुण्याकडे येण्यास खाजगी बसमध्ये चढली होती. किन्नरने तिला मागील सीटवर बसवून तिचा प्रथम विनयभंग केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरुणीने पुणे येथे पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी सदर तक्रार गोंदिया पोलिसांकडे दिली. पोलिस प्रकरणाचा तपास करत असून आरोपी अद्याप फरार आहे.

दरम्यान, या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खाजगी बसने प्रवास करणे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. सदर बस पोलिसांनी जप्त केली असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’