चेन्नईस्थित राप्ती इलेक्ट्रिक स्टार्टअपने त्यांच्या पहिल्या उत्पादनाचे अनावरण केले आहे. या ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक बाइक HV T30 शोकेस आहे. कंपनीने T30 आणि T30 Sport नावाच्या दोन नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या दोन्हीची किंमत 2.39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे आणि इच्छुकांनी 1,000 रुपयांच्या टोकनसह ही बाईक बुक करू शकतात. राप्तीने सांगितले की, ग्राहकांना जानेवारी 2025 पासून चेन्नई आणि बेंगळुरू येथून ई-बाईकची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.
बाईकमध्ये कारसारखी वैशिष्ट्ये
राप्ती एचव्हीचे डिझाइन प्रतिस्पर्धी स्ट्रीट फायटर मोटरसायकलसारखेच आहे. ही इलेक्ट्रिक बाइक ओव्हल आकाराचे हेडलॅम्प, शार्प फ्रंट मडगार्ड आणि स्प्लिट सीट सेटअपसह दिसायला अतिशय मजबूत आहे. इंजिनाऐवजी, येथे पूर्ण फेअरिंग दिसते जे बाइकच्या मागील भागापर्यंत पसरते. बाईक 7-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येते जी नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, OTA अपडेट्स आणि इतर माहिती प्रदान करते. ही बाईक आर्क्टिक व्हाईट, एक्लिप्स ब्लॅक, मर्क्युरी ग्रे आणि होरायझन रेड या चार रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. भारतातील पहिली हाय व्होल्टेज बाइक म्हणून तिचे वर्णन करण्यात आले आहे.
एका चार्जवर किती चालेल ?
आरामदायी राईडसाठी, इलेक्ट्रिक बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे USD आणि मोनोशॉक सस्पेंशन दिलेले आहे. समोर 320 mm डिस्क आणि मागील बाजूस 230 mm डिस्क व्यतिरिक्त ड्युअल पिस्टन फ्रंट कॅलिपर्स आणि रियर सिंगल पॅनल कॅलिपर देण्यात आले आहेत. हे 5.4 kWh-R बॅटरी पॅकसह येते जे पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमी पर्यंतची रेंज देते. टॉप स्पीड १३५ किमी/तास असल्याचा दावा केला जातो, तर तो ३.५ सेकंदात ०-६० किमी/ताशी वेग वाढवतो. यात 22 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 70 Nm पीक टॉर्क जनरेट करते.