भाजप महायुतीत सामील झाला आणखी एक पक्ष!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्यातील महायुतीला बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल (Shrihari Bagal) राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला (Rashtriya Swarajya Sena) महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात महायुतीची ताकद आणखीन वाढली आहे. राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीचा घटक केल्यानंतर यासंदर्भात एक पत्रक ही जारी करण्यात आले आहेत.

मुख्य म्हणजे, “राष्ट्रीय स्वराज्य सेना गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत आहे. आता महायुतीचा “महाविजय २०२४” साकार करण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे. यासाठीच ‘महाविजय २०२४ ‘साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना ही कामाला लागली आहे” असे ॲड. श्रीहरी बागल यांनी म्हटले आहे.

Swarajya sena

तसेच, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, प्रतोद/ समन्वयक पक्ष व राज्य सरकारच्यां मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करून सेना कामाला लागली आहे. आता सेना प्रत्येक जिल्हा निहाय मेळावे घेण्यास ही सुरुवात करत आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, “महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले” असे म्हणत ॲड. श्रीहरी बागल यांनी सरकारचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर, “समाजातील काही घटकांना कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास अडचणी येत असतील तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट संपर्क साधावा” असे आवाहन ॲड श्रीहरी बागल यांनी केले आहे.