राष्ट्रीय स्वराज्य सेना भाजपसोबत जाणार- ॲड.श्रीहरी बागल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रीय स्वराज्य सेनेने आगामी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्वराज्य सेनेच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.

श्रीहरी बागल यांनी आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विकास बागल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पोपट फुकटे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बुणे,जालना जिल्हा अध्यक्ष काशिनाथ टेकाळे, जळगांव जिल्हाध्यक्ष राहुल मराठे व जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी,ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर हनुमंत चव्हाण,मुंबई अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, व मुंबई चे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य उपस्थित होते.

महाविकास आघाडीने अडीच वर्षांच्या काळात मित्रपक्षांना जनतेसारखे झोपेत ठेवले असा आरोप श्रीहरी बागल यांनी केला. मराठी माणसाच्या मताचे विभाजन होऊ नये व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत जात आहोत अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे.