कोट्यवधींचे मालक असलेल्या Ratan Tata च्या भावाला देखील आवडते साधे राहणीमान, इंस्टाग्राम शेअर केला जुना फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tata Group चे प्रमुख Ratan Tata यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती देशभरात शोधूनही सापडणार नाही. देशातील अनेक तरुणांसाठी ते आदर्शस्थानी आहेत. कोट्यवधींचे मालक असलेले रतन टाटा हे आपल्या दानशूर स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. रतन टाटा यांच्याविषयी आपल्याला माहिती असले तरी त्यांच्या कुटुंबाबाबतची माहिती फारच कमी लोकांकडे आहे. आताच यावर चर्चा करण्याचे कारण असे कि, काल म्हणजेच मंगळवारी Ratan Tata यांनी आपला धाकटा भाऊ जिमी टाटासोबतचा एक जुना ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. जो पाहून अनेक लोकांच्या मनात त्याच्याविषयीचे कुतूहल जागे झाले. चला तर मग आज आपण जिमी टाटा यांच्या बाबतची माहिती जाणून घेउयात…

देशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये Ratan Tata यांचा समावेश आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2022 नुसार, रतन टाटा यांच्याकडे 3500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच, त्यांच्या भावाबाबत बोलायचे झाल्यासते अगदी साधे आयुष्य जगतात.

Meet Ratan Tata's younger brother Jimmy, who lives in 2-BHK flat, doesn't  own a mobile phone

भावासोबतचा फोटो केला शेअर

मंगळवारी इंस्टाग्राम पेजवर Ratan Tata यांनी आपल्या भावासोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 1945 सालच्या या फोटोमध्ये ते आपला भाऊ जिमी आणि त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करतानाच्या कॅप्शनमध्ये रतन टाटा यांनी लिहिले की, “ते खूप आनंदाचे दिवस होते, आमच्यात काहीही आले नाही.”

Why Ratan Tata's brother Jimmy Naval Tata is living an anonymous life… |  Why Ratan Tata

जिमी टाटा यांना आवडते साधे राहणीमान

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिमी टाटा हे Ratan Tata यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. रतन टाटाप्रमाणेच जिमी देखील अविवाहित आहे. तसेच त्यांना देखील साधे राहणीमान आवडते. ते मुंबईतील कुलाबा येथे एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. ते स्वतःला नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवतात. जिमी टाटा आपला बहुतेक वेळ पेपर वाचन करण्यात घालवतात.

Sneak Peek into Ratan Tata's Elegant White Colaba Home

अशा प्रकारे बनले कुटुंबाचा भाग

वास्तविक नवल टाटा हे टाटा कुटुंबाचे सदस्य नव्हते. नवल टाटा यांना सर रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाजबाई यांनी दत्तक घेतले होते. जिमी हे टाटा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत. त्यांचे वडील नवल टाटा यांच्याकडून त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांना हे पद देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/ratantata/?hl=en

हे पण वाचा :
निवृत्तीआधीच PF Account मधून काढायचे आहेत सर्व पैसे ??? जाणून घ्या त्याविषयीची महत्वाची माहिती
Senior Citizen FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या FD वर मिळेल सर्वाधिक व्याज
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 10 हजारांच्या SIP द्वारे मिळाला 12 कोटींचा रिटर्न