भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ एक नाटक!! संजय राऊतांची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी मी गेल्या 17 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा दिला असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. “मंत्री भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, “भुजबळ यांनी राजीनामा दिला असला तरी ते कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले” असे राऊतांनी म्हणले.

भुजबळांच्या राजनाम्याविषयी भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “भुजबळांनी घेतलेल्या भूमिका सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधी आहेत. जेव्हा मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणतरी भूमिका घेत तेव्हा त्याला मंत्री मंडळातून बरखास्त करण्यात येते. ही आतापर्यंतची परंपरा आहे. आता भुजबळ बोलत आहे की, मी राजीनामा दिला पण राजीनामा स्वीकारला नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार आहे हे एकनाथ शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे स्पष्ट करावे लागेल”

मी 16 नोव्हेंबरलाच पदाचा राजीनामा दिला…

दरम्यान, शुक्रवारी एल्गार यात्रेत बोलताना छगन भुजबळांनी सांगितले की, “मी अशी भाषणे करतो की सरकारमधल्या आणि विरोधी बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. एक जण तर म्हणाला, भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हकलून द्या. मला त्या नेत्याला सांगायचे आहे की, 17 नोव्हेंबरला अंबडला रॅली झाली. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला” त्यांनी केलेल्या या दाव्यामुळेच राजकीय नेत्यांचा सर्वांच्या भवया उंचावल्या आहेत. आता या राजीनामा प्रकरणी राजकारणात कोणते नाट्य रंगते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.