हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ravana Temples In India) रावण… भक्ती आणि शक्तीचे एक अनन्यसाधारण रूप मानले जाते. ज्याने भक्तीच्या मार्गाने स्वार्थ जपण्याचा प्रयत्न केला आणि अन्यायाचा व अधर्माचा मार्ग निवडला. त्याच्या ईर्ष्या आणि कुत्सित भावनेने उत्पत्ती झालेल्या रागातून त्याचा अंत प्रभू श्रीरामांच्या हाती झाला. रामायणात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाच्या पापी आणि अहंकारी वृत्तीचा कसा वध केला हे सांगण्यात आले आहे. लंकापती रावण हा ज्ञानी होता. मात्र अहंकाराने त्याच्या ज्ञानावर अस्पष्टता पसरली होती.
एकीकडे अवघ्या देशभरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा केली जाते. तर दुसरीकडे अन्याय, पापी, क्रूर, अहंकारी, मत्सर अशा अनेक कुत्सित भावनांमुळे खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी केले जाते. (Ravana Temples In India) पण ज्या देशात लोक रावणाला खलनायक मानतात, त्याच देशात काही भागांमध्ये रावणाची पूजा केली जाते. नुसती पूजा नव्हे तर काही ठिकाणी रावणाची अद्भुत मंदिरे आहेत. जिथे अनेक लोक श्रद्धा आणि भावनेने रावणाची पूजा करतात.
अन्याय आणि अधर्माचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रावणामध्ये देखील काही चांगले गुण होते. ज्याविषयी अनेक ग्रंथ, पुराण आणि अगदी रामायणात देखील उल्लेख केला आहे. (Ravana Temples In India) जो ज्ञानी होता, पंडित होता, त्याला अनेक कला अवगत होत्या, शिवाय तो एक सच्चा भक्त होता असेही म्हटले जाते. त्यामुळे भारतातील काही ठिकाणी रावणाच्या या चांगल्या कला गुणांचे पूजन केले जाते. चला तर भारतात रावणाची मंदिरे कुठे आहेत? याविषयी आपण जाणून घेऊया.
1. काकीनाडा – आंध्र प्रदेश
आंध्रप्रदेशातील काकीनाडा हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे. (Ravana Temples In India) येथे बीच रोडवर काकीनाडा नावाचे प्रसिद्ध असणारे मंदिर हे रावणाचे मंदिर आहे. रावण हा नाथांचे नाथ भोलेनाथ अर्थात शंभू महादेवाचा मोठा भक्त होता. त्यामुळे या मंदिरात मोठ्या शिवलिंगासह रावणाची मूर्ती पहायला मिळते. ही मूर्ती सुमारे ३० फुटाची असून येथे रावणाची पूजा केली जाते.
2. मंडोर – राजस्थान (Ravana Temples In India)
राजस्थानमधील मंडोर या ठिकाणी देखील रावणाचे भव्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, मंडोरमधील स्थायिक लोक हे प्रामुख्याने मौदगील आणि दवे ब्राह्मण आहेत. हे लोक रावणाला आपला जावई मानतात आणि म्हणूनच या ठिकाणी रावणाची विधीवत सन्मानाने पूजा केली जाते.
3. बैजनाथ – हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील कांगडा या जिल्ह्यात बैजनाथ मंदिर आहे. खरंतर हे मंदिर महादेवाचे आहे. त्यामुळे या मंदिरात भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणाशी रावणाचा घनिष्ट संबंध आहे. येथे सांगितल्या जाणाऱ्या कथानकांचा काही पौराणिक ग्रंथांमध्ये समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील रावणाची पूजा केली जाते.
4. विदिशा – मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात विदिशा नावाचे एक सुंदर गाव आहे. (Ravana Temples In India) असे म्हटले जाते की, रावणाची पत्नी अर्थात राणी मंदोदरी ही मूळ या ठिकाणची होती. अर्थात विदिशा हे रावणाचे सासर आणि या गावासाठी रावण जावई आहे. म्हणूनच या ठिकाणी देखील रावणाची आदराने पूजा केली जाते.
5. मंदसौर – मध्य प्रदेश
राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर इंदूर या प्रसिद्ध शहरापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर मंदसौर नावाचे एक शहर आहे. या शहरात दशानन रावणाची १० मस्तकी मूर्ती स्थापित केलेले एक मंदिर आहे. या मूर्तीची उंची सुमारे ३५ फूट असून या मूर्तीरूपात रावणाची स्तुती केली जाते.
6. बिसराख – उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात बिसरख नावाचे एक गाव आहे. या गावी रावणाचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. (Ravana Temples In India) उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाजवळ स्थित असलेलं हे गाव रावणाचं जन्मस्थान असल्यामुळे या ठिकाणी रावणाच्या चांगल्या गुणांची स्तुती करत त्याचे पूजन केले जाते.
7. कानपूर – उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये देखील रावणाचे एक मंदिर आहे. ज्या ठिकाणी रावनातील चांगले गूण आणि त्याच्या कलांचे गुणगान केले जाते. या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.
8. अकोला – महाराष्ट्र
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा रावणाचे एकमेवा मंदिर आहे. अकोला येथील पातूर तालुक्यात सांगोळा नावाचे एक गाव आहे. या गावात नियमित स्वरूपात रावणाची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान मानले जाते. (Ravana Temples In India)