वाघोबाचे फोटो काढणं रविना टंडनला पडलं महागात; वन अधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन अलीकडे सोशल मीडियावर खूप सक्रिय राहत आहे. आपल्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तसेच प्रवासाचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. रवीना टंडन सध्या वाघाच्या फोटोशूटमूळे चांगलीच चर्चेत आली आणि त्यामुळे तिच्या अडचणीही वाढल्या आहेत. नुकतचं तिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो आणि वाघाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. यावरून आता वन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

रवीना टंडनने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघ आणि त्याच्या बछड्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून आता वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची आणि चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कधी घडली घटना?

रवीना टंडन सध्या मध्य प्रदेशमध्ये शूटिंग करत आहे. तिने तिच्या भोपाळमधील शुटिंगदरम्यानचे मजेदार क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी तिने भोपाळजवळील नर्मदापुरम जिल्ह्यातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाची सफारी केली. तिच्यासोबत तयावेळी वनविभागाने दिलेले प्रशिक्षित मार्गदर्शक आणि चालक देखील होते. रवीनाने जीपचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. कॅमेऱ्याच्या शटरचा आवाज क्लिपमध्ये ऐकू येतो आणि राखीव भागात एक वाघ त्यांच्याकडे ओरडताना ऐकू येतोय.

tiger

रवीनाकडून स्पष्टीकरण

रविना टंडनने या सर्व प्रकरणावर एक ट्विट पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. आपली एखादीही अचानक केलेली हलचाल त्यांना विचलित करु शकते .सुदैवाने आम्ही अशी काही हलचाल केली नाही. आम्ही तिच्या वाटेला गलो नाही फक्त तिला शांतपणे पाहत राहिलो. यापुर्वीही केटी वाघिणीच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.” असे तिने म्हंटले आहे.