हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ravindra Jadeja : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जातो आहे. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाला नामोहरम केले आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 5 बळी घेत कांगारू संघाला 177 धावांत गुंडाळण्यात मोठी भूमिका बजावली. मात्र रवींद्र जडेजाची ही जबरदस्त कामगिरी ऑस्ट्रेलियन मीडियाच्या पचनी पडलेली दिसत नाही. कारण त्यांनी यावेळी जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे.
जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप
Ravindra Jadeja वर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाल्यानंतर लगेचच मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट हे एक्शन मोडमध्ये आले आहेत. या आरोपानंतर त्यांनी झटपट पावले उचलत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले.उचलले. हे जाणून घ्या कि, अँडी पायक्रॉफ्ट हे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुरात खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यात सामनाधिकारी आहेत.
रोहित आणि टीम मॅनेजरला दाखवण्यात आला व्हिडिओ
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक यांच्यासहीत रवींद्र जडेजाला एक व्हिडिओ क्लिप दाखवली. ज्यामध्ये Ravindra Jadeja चेंडू फेकण्यापूर्वी सहकारी मोहम्मद सिराजकडे जातो. त्यांच्याकडून बाम सारखी वस्तू घेतो आणि ती आपल्या बोटांवर लावतो.
What do you think of this @64MohsinKamal. Looks like Siraj giving grippo to Jadeja and him rubbing it all over his spinning finger to me. Thoughts?#INDvsAUS pic.twitter.com/VyBfRaZi4z
— Jasif Hassan (@imjasif) February 9, 2023
यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना सांगितले की, या व्हिडिओ क्लिपमध्ये Ravindra Jadeja आपल्या बोटावर वेदना कमी करणारी क्रीम लावत आहे. मात्र इथे हे जाणून घ्या कि, या प्रकरणाबाबत ऑस्ट्रेलियन संघाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. हे फक्त ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू Ravindra Jadeja बाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.
एका चाहत्याने हे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने ‘इंटरेस्टिंग’ असे उत्तर दिले. बीसीसीआयच्या एका सूत्राने याबाबत सांगितले की, ‘बोटाची वेदना कमी करण्यासाठीचे हे मलम’ आहे. मात्र हे जाणून घ्या कि, सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाचे सदस्य असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना 2018 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदीचा सामना करावा लागला होता.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://twitter.com/search?q=ravindra+jadeja+ball+tampering&ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Esearch
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!
Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या
Valentine’s Day च्या निमित्ताने आपल्या जोडीदाराला गिफ्ट करता येतील ‘हे’ 5 गॅजेट्स
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Indian Railway : रेल्वेमध्ये लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांचे डबे का असतात ??? जाणून घ्या रंगांचा अर्थ