देशात पुन्हा नोटबंदी! आता ‘हि’ नोट चलनातून बाद; RBI ने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला होता. त्यांनतर आता देशात पुन्हा नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबर पासून २००० रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बँकिंग क्षेत्रावर करडी नजर ठेऊन सर्वच बँकांच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवत असते. देशातील आर्थिक व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी सजग असणाऱ्या RBI बँकेने नुकतीच 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना तात्काळ 2,000 रुपयांच्या नोटांवर लादण्याची घोषणा केली असली तरी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या वैध्य असतील.

RBI 2016 मध्ये केली होती घोषणा

RBI ने RBI कायदा 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये या 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने घोषित केलेल्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नवीन नोट बाजारात सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिली होती त्यावेळी चलनातून हद्दपार करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हा 2,000 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे सदर घोषणेत सांगण्यात आले.

सद्य स्थितीत बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश आता पूर्ण झाला आहे. परिणामी 2,000 रुपयांची नोट भारतीय अर्थ व्यवस्थेतून हद्दपार करण्याचा निर्णय घेत त्या व्यवहारातून बाद करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे सामान्य जणांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

23 मे पासून बँकांमध्ये नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लोक त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतील किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन इतर रक्कमेच्या नोटांसह त्या बदलू शकतील.फक्त एका वेळी जास्तीत जास्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. हे त्यांनी लक्षात असू द्यावे ही प्रक्रिया 23 मे पासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.