हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर (Repo rate) 25 बेसिस पॉइंट्स ने कमी करून 6 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे येत्या काही कालावधीत गृह, वाहन अन वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे, म्हणजेच या कर्जावर द्यावे लागणारे व्याजदर कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे . तसेच या निर्णयाची अधिकृत घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून करण्यात आली आहे.
ईएमआयमध्ये सर्वसामान्याना दिलासा मिळणार –
यंदाच्या पतधोरण समितीकडून, RBI कडून रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने घटवण्यात आला आहे. त्यामुळे रेपो दर हा 6.25 टक्क्यावरून तो थेट 6 % करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बँकांकडून लावल्या जाणाऱ्या अतिरिक्त व्याजदराचा आळा बसणार आहे. व्याजदरात कपात झाल्यामुळे ईएमआयमध्ये सर्वसामान्याना दिलासा मिळणार आहे. कारण लोकांच्या आता जास्त पैसे पाहण्यास मिळणार आहे.
कर्जांच्या व्याजदरात घट होणार –
रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्यामुळे बँकांना कर्जांवरील व्याजदर कमी करण्यासाठी दबाव वाढू शकतो , असा अंदाज वर्तवला जात आहे . याचा फायदा गृहकर्ज अन वाहन कर्ज घेणाऱ्या सामान्य ग्राहकांना होऊ शकतो, ज्यांच्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये कमी होण्याची अपेक्षा आहे, म्हणजेच रेपो रेटमध्ये घट झाल्यामुळे बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अन इतर कर्जांच्या व्याजदरात घट होऊ शकते.