RBI Rules | क्रेडिट कार्ड धारकांना मोठा दिलासा, RBI ने केला ‘या’ नियमामध्ये मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI Rules | आपल्यापैकी अनेक जणांकडे क्रेडिट कार्ड असते. या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये अनेक बदल होत असतात. अशातच आता भारतीय रिझर्व बँकेने क्रेडिट कार्ड संबंधी नियमांमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन नियमानुसार आता क्रेडिट कार्डधारक हे त्यांच्या सोयीनुसार कार्डचे बिलिंग सायकल एकापेक्षा जास्त वेळा देखील बदलू शकतात.

याआधी बँका किंवा वित्तीय संस्था एकदाच ही संधी देत होते. परंतु आता आरबीआयने (RBI Rules) ही मर्यादा काढून टाकण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्ड धारकांना त्यांचे बिलिंग सायकल एकापेक्षा जास्त वेळा बदलता येणारे आहे.

ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डच्या बिल्डिंग सायकल काय असेल? हे आतापर्यंत क्रेडिट कार्ड कंपनी ठरवत होत्या. त्यामुळे ग्राहकांना अनेकवेळा या समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता यासंबंधी आरबीआयने काही नवीन नियमित केलेले आहे आणि या नवीन नियमानुसार ग्राहक त्यांच्या सोयीनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग कालावधी एकापेक्षा जास्त वेळा बदलू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीने त्याचे बिलिंग सायकल बदलले, तर त्याच्या क्रेडिट कार्डच्या बिलाची देण्याची तारीख देखील बदलते ही देय तारीख स्टेटमेंट तयार झाल्याच्या तारखेपासून 15 ते 20 दिवसानंतर असू शकते. म्हणजेच आता ग्राहकांना 40 ते 50 दिवसाच्या व्याज मुक्त कालावधी मिळतो.

असा करा बदल | RBI Rules

  • तुम्हाला पूर्वीची सर्व थकबाकी भरणे गरजेचे आहे
  • क्रेडिट कार्ड कंपनीला तुम्ही बिलिंग सायकलमध्ये बदल करण्यास सांगावे लागणार आहे.
  • काही बँकांच्या मोबाईल ॲपद्वारे देखील तुम्ही हा बदल करू शकता.

हा होईल फायदा ?

  • आरबीआयने केलेल्या या नवीन बदलानुसार आता ग्राहक त्यांच्या सोयीनुसार बिल भरण्याची तारीख ठरवू शकतात.
  • त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरील व्याज मुक्त कालावधी देखील आता ग्राहक वाढवू शकतात.
  • एकाच तारखेला आता वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सचे पेमेंट देखील करता येणार आहे.

Billing cycle म्हणजे काय?

बिल्डिंग सायकल म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्डचे बिल हे दर महिन्याच्या 6 तारखेला येत असेल आणि तर त्याचे बिलिंग सायकल त्या महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होते. पुढील महिन्याची 6 तारख संपते तीस दिवसांच्या कालावधीत क्रेडिट कार्डद्वारे केलेले सर्वे व्यवहार क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर दिसतात. हा कालावधी कार्ड प्रकार आणि क्रेडिट कार्ड कंपनीनुसार 27 दिवसांपासून ते 21 दिवसांपर्यंत असू शकतो.