Monday, January 30, 2023

RBI कडून मोठी घोषणा आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी देणार

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. अशातच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआय आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

याबाबत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आरबीआयची नजर आहे. कोरोनाच्याचा पहिलया लाटेनंतर काहीशी सुधारणा झाली होती. दरम्यान आरबीआयनं इमर्जन्सी हेल्थ सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे. भारतीय रिझर्व बँक वाढत्या कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुसर्‍या लाटेमुळे त्रस्त नागरिक व्यापारी संस्था आणि संस्थांसाठी सर्व संसाधन आणि उपकरणात तैनात करेल अशी माहिती शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

- Advertisement -

इमर्जन्सी हेल्थ सेवेसाठी 50,000 कोटी

याबाबत बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की ‘आरबीआय ने आपात्कालीन आरोग्य सेवांसाठी 50 हजार कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे बँका लसींचे उत्पादन, लस वाहतूक, निर्यातदारांना सोप्या हप्त्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देतील. याशिवाय रुग्णालय, आरोग्य सेवा पुरवठा करणाऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. लवकरच कर्ज आणि इन्सेंटिव्ह दिले जाईल अशी माहिती शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की सरकार कडून लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेग वाढवला जातो ग्लोबल इकॉनॉमी मध्ये देखील रिकवरीचे संकेत आहेत. चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागातही तेजीचे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले आहेत.