Mr.360 एबी डीव्हिलीयर्स आयपीएलसाठी सज्ज ; शेअर केला ‘हा’ खास फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आयपीएलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. डीव्हिलीयर्स मैदानात उतरल्यानंतर प्रेक्षक नेहमीच ABD!!! ABD!! चा नारा देत असतात. याच दरम्यान एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट चाहत्यांना एक संदेश दिला आहे. एबीने आयपीएल -13 साठी कंबर कसली आहे आणि लवकरच तो मैदानात पदार्पण करण्यास उत्सुक आहे.

क्रिकेट जगतात ‘मिस्टर 360’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्स त्याच्या क्रिकेट किट बॅगसह दिसत आहे. एबीडी कडे एक बॅट आहे. सोबतच कोरोनामुळे त्याने मास्क देखील लावलं आहे.

https://www.instagram.com/p/CEYu5ezg0ty/?utm_source=ig_web_copy_link

एबी डिव्हिलियर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दुबईमधील त्याचा क्वारंटाईन कालावधी संपला असून आता तो मैदानात परतण्यासाठी उत्सूक आहे. बुधवारी एबी डिव्हिलियर्सची आयपीएल टीम आरसीबीचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. गुरुवारपासून टीमचा तीन आठवड्यांचा सराव सुरू होणार आहे. एबी डीव्हिलियर्ससह आरसीबीच्या सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला असून संघ सरावासाठी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’