RD Interest Rates : ‘या’ बँकांनी बदलले RD वरील व्याजदर; पहा कुठे मिळतील सर्वाधिक रिटर्न्स?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RD Interest Rates) देशभरात गुंतवणूकदारांची संख्या काही कमी नाही. पैसा कमावण्याइतकाच योग्य ठिकाणी गुंतवणे देखील महत्वाचे असते आणि त्यामुळे बरेच लोक सरकारी योजना तसेच बँकांच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. यापैकी एक सर्वाधिक पसंत केला जाणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे आवर्ती ठेव अर्थात RD. देशातील अनेक गुंतवणूकदारांनी RD मध्ये गुंतवणूक केली असेल. यात केलेली गुंतवणूक ही मोठा निधी जमा करण्यासाठी सहाय्यक ठरते.

दरम्यान, अनेक बँकांनी त्यांच्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. त्यामुळे कोणत्या बँकेत RD केल्यास सर्वाधिक परताव्याचा लाभ मिळेल? (RD Interest Rates) याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच आज आपण विविध बँकांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदराची माहिती घेणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्हाला आवर्ती ठेव (RD) मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक लाभ मिळवता येईल.

1) HDFC बँक (RD Interest Rates)

वृत्तानुसार, HDFC बँकेने आपल्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. यात २७ महिने आणि ३६ महिने कालावधीच्या आवर्ती ठेवींसाठी सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सामान्य नागरिकांना ७.१५% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६५% इतका व्याजदर दिला जातोय. तसेच ३९ महिने, ४८ महिने आणि ६० महिने कालावधीच्या आवर्ती ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना ७.२०% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७०% व्याजदर दिला जात आहे.

2) ICICI बँक

ICICI बँकेने देखील आवर्ती ठेवींवरील व्याजदर सुधारित केले आहेत. जे १७ फेब्रुवारी २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. (RD Interest Rates) त्यानुसार, ICICI बँक ही आपल्या ग्राहकांना ६ महिने ते १० वर्ष कालावधीच्या आवर्ती ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना ४.७५% ते ७.२०% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५% ते ७.७५% इतका व्याजदर देते आहे.

3) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी आवर्ती ठेवींवर व्याजदर बदलले आहेत. (RD Interest Rates) त्यानुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना १ वर्ष ते १० वर्ष कालावधीच्या आवर्ती ठेवींवर ६.८०% ते 7% इतका व्याजदर देत आहे.

4) YES बँक

YES बँकेने देखील आपल्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. त्यानुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना ६ महिने ते ५ वर्ष इतक्या कालावधीच्या आवर्ती ठेवींवर ६.१०% ते ८% इतका व्याजदर देत आहे. दरम्यान, उशीरा पेमेंट केल्यास बँकेकडून १% दंड आकारला जाणार आहे. (RD Interest Rates) हे नवे व्याजदर ३० मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.

5) पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आवर्ती ठेवींवरील व्याजदर सुधारित करून ४.५०% ते ७.२५% इतके केले आहेत. माहितीनुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना १ महिन्याच्या पटीत ६ महिने ते १२० महिने कालावधीसाठी हे व्याजदर लागू करेल. समजा, जर तुम्ही तुमचे प्रलंबित हप्ते मॅच्युरिटी तारखेपूर्वी जमा केले तर बँक दंड आकारू शकते. (RD Interest Rates)