शेतकऱ्यांनो चंदनाची शेती करून कोट्यावधी रुपये कमवा!! त्यापूर्वी लागवडीची पद्धत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसायात नफा कमावण्यावर शेतकरी सर्वाधिक भर देताना दिसत आहेत. परंतु आम्ही सांगू इच्छितो की, यासह चंदनाची शेती (Sandalwood Cultivation) करून देखील शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळू शकतो. शेतकऱ्याने चंदनाची लागवड केल्यास यातून तो कोट्यावधी रुपये कमवू शकतो. मात्र यासाठी सर्वात प्रथम चंदनाची लागवड कशी केली जाते आणि त्याची काळजी कशी घ्यावी लागते याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

चंदनाची लागवड कशी केली जाते?

देशामध्ये कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड करण्यात येते. या लागवडीतून शेतकरी लाखो रुपये कमवतात. चंदनाची लागवड करण्यासाठी सर्वात प्रथम त्याचे रोप लावावे लागते. हे रोप वर्षापेक्षा कालावधीचे असायला हवे. चंदनाचे रोप लावल्यानंतर त्याची योग्यरीत्या काळजी घ्यावी लागते. ज्या ठिकाणी चंदनाचे झाड लावले आहे तेथे पाणी साचू देता कामा नये. शेतकऱ्याने एका एकरमध्ये चंदनाची झाडे लावली तर त्यातून तो कोट्यावधी रुपये कमवू शकतो.

नफा किती मिळतो?

चंदनापासून विविध वस्तू, सुगंधी साधने, अत्तर, साबण अशा कित्येक गोष्टी बनवल्या जातात त्यामुळे चंदनाची मागणी बाजारपेठेत सर्वाधिक केली जाते. बाजारामध्ये चंदन खूप महाग मिळते. यात जर तुम्ही चंदनाची शेती केली तर एका झाडापासून पाच ते सहा लाख रुपये तुम्ही कमवू शकता. अंदाजे, एका एकरमध्ये चंदनाची 600 झाडे बसू शकतात. या सहाशे झाडांपासून 30 कोटी रुपयांचा नफा मिळू शकतो. त्यामुळे एका एकरापेक्षा कमी जमिनीत चंदनाचे झाडे लावली तरी त्यातून लाखो रुपये तर नक्कीच मिळू शकतात.

हवामान कसे लागते?

महत्वाचे म्हणजे चंदनाच्या झाडांची लागवड करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बागायती जमिनीची गरज पडत नाही. ओसाड असलेल्या माळरानात किंवा एखादी चांगली जमीन बघून देखील तिथे चंदनाच्या झाडांची लागवड केली जाऊ शकते. चंदनाच्या झाडांसाठी थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश असणे आवश्यक असते. अशा हवामानामध्ये चंदनाची लागवड योग्य पद्धतीने होते. लक्षात घ्या की, पावसाला सुरुवात होताच म्हणजेच जून, जुलै, ऑगस्टमध्ये चंदनाच्या रोपांची लागवड करता येते.