कार किंवा बाईकसाठी युनिक नंबर कसा मिळवायचा? पूर्ण प्रोसेस समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखादी नवीन कार घेत असताना आपल्याला नंबर ही तितकाच फॅन्सी मिळावा, अशी सर्वांची इच्छा असते. अनेकवेळा तर फक्त गाडीचा नंबर चांगला (Car New Number) नसल्यामुळे काहीजण ती गाडी घेणेच टाळून देतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? आपण आपल्या इच्छेनुसार देखील कार किंवा बाईकसाठी युनिक नंबर घेऊ शकतो. यासाठी फक्त काही पैसे भरावे लागतात. कारण, तुम्हाला एखादा युनिक नंबर हवा असेल तर त्यासाठी नंबर्सचा लिलाव करण्यात येतो. या लिलावामध्ये तुम्ही पैसे देऊन हवा तो नंबर घेऊ शकता.

तुम्हाला जर तुमच्या गाडीचा नंबर आवडत नसेल किंवा तो बदलायचा असेल तर तुम्ही ई-लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी सर्वात अगोदर हा लिलाव नक्की कशा पद्धतीने चालतो? त्यामध्ये कसा सहभाग नोंदवता येतो हे जाणून घ्या. ई लिलावासाठी सर्वात प्रथम तुम्हाला रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

  • तुम्ही रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेला तर या ठिकाणी तुम्हाला पब्लिक यूजर म्हणून लॉगइन आणि रजिस्टर करावे लागेल.
  • पुढे साईन-अप करून आपले अकाउंट लॉगिन करा.
  • यानंतर तुम्हाला जो युनिक नंबर हवा आहे तो निवडा.
  • पुढे नंबर घेण्यासाठी लागणारे शुल्क भरून आपला नंबर रिझर्व करा.
  • यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या व्हीआयपी नंबरसाठी बोली लावा.
  • हा लिलाव संपल्यानंतर विजय त्यांची घोषणा करण्यात येते. ज्याने सर्वाधिक बोली लावलेली असेल त्याला तो नंबर मिळून जातो.
  • पुढे तुम्ही लिलाव जिंकला नसाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी भरलेली फी परत करण्यात येते.
  • विविध राज्यांमध्ये व्हीआयपी कार नंबरसाठी वेगवेगळी वेबसाईट तयार करण्यात आलेली असते. सुरुवातीला बोली बेस प्राईजपासूनच सुरू होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येते. ज्यामुळे तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासत नाही.