लिंबू गवताची शेती करून व्हा लखपती; उत्पादन कसे घ्यावे? खर्च किती येईल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शेती केल्यानंतर नफा मिळत नाही असे अनेकवेळा सांगितले जाते. परंतु शेतीमध्ये अशी काही उत्पादने आहेत जी घेतल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन करून लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेती विषयीची माहिती देणार आहोत. ही शेती केल्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या शेतीच्या व्यवसायासाठी किती रुपये खर्च येईल? याचा फायदा कसा घेता येईल? आपण जाणून घेऊया.

फक्त 20 हजार रुपयात करा शेती

सध्या बाजारामध्ये इतर उत्पादनांबरोबर लिंबू गवताला (Lemongrass) अधिक मागणी करण्यात येत आहे. लिंबू गवताची शेती केल्यानंतर तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकेल. लिंबू गवताची शेती करण्यासाठी तुम्हाला फक्त 20 हजार रुपये मोजावे लागतील. यापूर्वी लिंबू गवताच्या शेतीचा उल्लेख पीएम नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमांमध्ये केला होता. तेव्हा ते म्हणले होते की, लिंबू गवताची लागवड केल्यास शेतकरी स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतो. यातूनच आपण समजू शकतो की, लिंबू गवताची शेती शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते.

4 लाख रुपयांपर्यंत नफा

त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लिंबू गवतापासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्यात वापरले जाते. या तेलाचे अनेक गुणकारी फायदे असल्यामुळे त्याला बाजारात देखील चांगला भाव मिळतो. या गवताच्या लागवडीची खास गोष्ट म्हणजे, लिंबू गवताची शेती दुष्काळग्रस्त भागातही करण्यात येते. लिंबू गवताची लागवड करून तुम्ही फक्त एक हेक्टरमधून एका वर्षात 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. लिंबू गवताच्या लागवडीसाठी खताची गरज लागत नाही. हे पीक एकदा पेरले की ते 5-6 वर्षे टिकून राहते.

लिंबू गवताचे उत्पादन कधी करावे?

लिंबू गवताची लागवड फेब्रुवारी ते जुलै दरम्यान करावी. एकदा लागवड केल्यावर त्याची सहा ते सात वेळा कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा होते. लिंबू गवतापासून तेल काढले जाते. एका हेक्टर जमिनीतून वर्षभरात सुमारे 3 ते 5 लिटर तेल निघते. या तेलाची किंमत 1,000 रुपयांपासून 1,500 रुपयांपर्यंत आहे.