हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Yojana) 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा देण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ड दाखवून तुम्ही शहरातील किंवा गावातील कोणत्याही रुग्णालयामध्ये मोफत उपचार सेवा घेऊ शकता. परंतु हे मोफत उपचार मिळणारे रुग्णालय कसे शोधायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचेच आम्ही आज तुम्हाला उत्तर देणार आहोत.
तुम्ही जर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले असेल तर तुम्हाला शहरातील किंवा गावातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सेवा घेता येऊ शकते. परंतु यासाठी तुम्हाला नेमक्या कोण कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतात हे माहीत असणे आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही pmjay.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
pmjay.gov.in च्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला फाइंड हॉस्पिटल नावाचा पर्याय दिसून येईल. यावरच तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला पुढे दिसणाऱ्या पेजवर आपले राज्य, जिल्हा आणि रुग्णालयाचा प्रकार या संबंधित माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला स्क्रीनवर दिलेला कोड भरावा लागेल. यानंतरच तुम्हाला दिसून येईल की तुम्ही कोणत्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार सेवा घेऊ शकता.
दरम्यान, आयुष्यमान भारत योजना, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब आणि गरजू कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतो.
तुम्ही शहरी भागात राहत असाल किंवा ग्रामीण, तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही त्या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता. मोफत किंवा स्वस्त रेशन, पेन्शन, विमा, मोफत शिक्षण, घरे बांधण्यासाठी अनुदान यासारख्या योजनांसोबतच इतर अनेक फायदेशीर योजनाही केंद्र सरकार राबवत आहेत.