Manoj Jarange Patil: 2011 ते 2024 मराठा आरक्षणासाठी झुंज!! असा राहीला मनोज जरांगे पाटलांचा ‘संघर्षमय’ प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. कारण अखेर 14 वर्षांचा वनवास सहन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. 2011 सालापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार विरोधात आंदोलन करत होता. अखेर या आंदोलनाला 2024 मध्ये यश आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामागे मनोज जरांगे पाटील याच्या संघर्षाचा मोठा वाटा आहे. अंतरवली सराटी येथून सुरू झालेल्या आंदोलन आज यश संपादन करून मुंबईत मागे घेण्यात आले आहे.

2011 साली आरक्षणासाठी आंदोलन सुरू

2011 सालापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग नोंदवत आले होते. आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय नाव म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. अवघ्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ते मराठा आंदोलनाचे नेतृत्व देखील करू लागले. सर्वात प्रथम त्यांनी 2014 साली छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. मनोज जरांगे पाटील यांनी 2015 ते 2024 या काळात 30 पेक्षा अधिक आंदोलने केली.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) कोण आहेत?

मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील मोतोरी गावातील रहिवासी आहेत. पुढे जाऊन त्यांनी बीडमधून जालनामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरची परिस्थिती देखील त्यावेळी बेताची होती. त्यामुळे ते एका हॉटेलमध्ये उपजीविकेसाठी काम करत होते. मात्र या काळात मराठा समाजाचे होणारे हाल पाहता त्यांनी समाजासाठी काम करायचा निर्णय घेतला. या काळात त्यांचे कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष झाले. मराठा आंदोलन उभ करण्यासाठी जरांगे पाटील यांनी स्वतःची जमीन देखील विकली. रास्ता रोको आंदोलन असो किंवा ठिय्या आंदोलन असो अशी अनेक आंदोलने मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केली.

यावेळी मनोज जरांगेंचे नाव समोर आले

29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र हे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून 1 सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला तसेच अनेक आंदोलन गंभीर जखमी झाले. या लाठीचार्जमुळेच म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुख्य म्हणजे, याला तिच्यानंतरच मराठा आंदोलनाला आणखीन बळ मिळाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील आमरण उपोषणाला देखील बसले. तेव्हा त्यांना संपूर्ण मराठा समाजाने पाठिंबा दर्शवला. या काळात सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मुंबईच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. अखेर या आंदोलनाचा सुरूवात होताच, सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.