Real Estate : जर तुम्ही योग्य मालमत्ता निवडली असेल तर रिअल इस्टेट (Real Estate) गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे . चुकीच्या मालमत्ता गुंतवणुकीचा निर्णय तुमच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे तुमच्या मालमत्ता खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे महत्त्वाचे आहे. घेतलेली गुंतवणूक पुढे जाऊन तुम्हाला विकायची असेल तर घर घेतानाच तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती तुम्हाला आम्ही आजच्या लेखात देणार आहोत.
रेरा नोंदणी (Real Estate)
रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजेच बिल्डरने रेरा (RERA) मध्ये नोंदणी केली आहे का नाही याची खात्री करा. जर बिल्डर कडून ही नोंदणी केली गेली नसेल तर तिथे घर घेणे टाळा. अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो
लोकेशन
तुम्ही एखादी प्रॉपर्टी किंवा घर जमीन अशा गोष्टींची खरेदी करत असतात तेव्हा त्याचे लोकेशन किंवा ती जागा बघणं महत्त्वाचं असतं. मुळात यावरच तुम्हाला त्याची रिसेल व्हॅल्यू (Real Estate) किती आहे कशी असेल हे अवलंबून असते. तुम्ही अशा लोकेशनची निवड करा जिथे पुढे जाऊन आजूबाजूच्या भागाचा विकास तर होईलच शिवाय त्या जागेतून तुम्हाला मोठा रिटर्न मिळेल. यासाठी प्राईम एरिया निवडणे महत्त्वाचे आहे. पुण्याचे उदाहरण घेतले तर पुण्यामध्ये घर पाहत असताना लोकेशन वाईज तिथून ऑफिसेस किंवा आयटी पार्क अशा गोष्टी कितपत जवळ आहे हे बघने महत्त्वाचे ठरेल. जेणेकरून पुढे जेव्हा तुम्ही घर विकाल तेव्हा त्याला चांगली किंमत मिळेल.
पब्लिक ट्रान्सपोर्ट (Real Estate)
घर खरेदी करत असताना तुमच्या घरापासून पब्लिक ट्रान्सपोर्टची (Real Estate) काय सुविधा आहे? रिक्षा , बसेस , ट्रेन इत्यादींची काय सुविधा आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जिथे अशी कनेक्टिव्हिटी असते तिथे प्रॉपर्टीचा दर चांगला मिळतो. त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
सुविधा
एखादी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्या मालमत्तेपासून जवळ असणाऱ्या सोयी सुविधा काय आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. जसं की शाळा, रुग्णालय, गार्डन शॉपिंग कॉम्प्लेक्स (Real Estate)या सर्व गोष्टी किती दूर आहेत हे नक्की तपासा जेणेकरून तुम्हाला हे घर विकताना चांगला मोबदला आणि चांगले खरेदीदार मिळू शकतील