Real Estate : स्वत:चं घर विकत घेण्याचं स्वप्न पहाताय? या वर्षी ‘इतक्या’ लाख फ्लॅट्सची विक्री होणार, पहा रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशभरातील लाखो लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीसुद्धा स्वत:चे घर बुक करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. यावर्षी रिअल इस्टेट डेव्हलपर्स 5.58 लाख घरांच्या चाव्या त्यांच्या मालकांना सोपवण्याची शक्यता आहे. याभातचा एक रिपोर्ट आता समोर आला असून यामुळे ग्राहकांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

“कुणी घर देता का ? घर ” हे नटसम्राट सिनेमातील वाक्य आपण कधीच विसरू शकत नाही. कारण आयुष्याच्या सरते शेवटी तरी उतार वयात आपल्या माणसांच्या सानिध्यात उरलेले दिवस आनंदाने आपल्या हक्काच्या घरात घालवावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण कष्ट उपसत असतो. बऱ्याचदा आपण गृहकर्ज मिळवून बांधकाम व्यावसायिकांना ते वेळे आधीच सुपूर्त करून हक्काच्या घरात जाण्याची प्रतीक्षा करत असतो.

म्हाडाचं घर विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

पण कधी कधी काही ना काही करणं सांगून बांधकाम व्यावसायिक वेळखाऊपणा दाखवून आपल्या हातात हक्काच्या घराच्या चाव्या देताना टाळाटाळ करत असतात. पण आता असे होणार नाही कारण real estate consulting firm ‘ Anarock’ च्या म्हणण्यानुसार गृह निर्माण करणाऱ्या विकासकांनी म्हणजेच बिल्डरांनी आता आपली कामं अधिक वेगाने करण्यावर भर दिला असल्याने या वर्षी रेडी टू मूव्ह फ्लॅटची संख्या वाढणार आहे.

या संदर्भात म्हैती देताना ‘Anarock’ ने असे सुचवले आहे कि रिअल इस्टेट डेव्हलपर्स 2023 मध्ये देशातील प्रमुख सात शहरांमध्ये 5.58 लाख घरांचे बांधकाम पूर्ण करू शकतात. एनरॉकच्या आकडेवारीनुसार, 5,57,900 घरांचे बांधकाम 2023 मध्ये पूर्ण करायचे आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात 4,02,000 घरांचे बांधकाम पूर्ण करायचे होते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण झाले की नाही, तरीही याची माहिती अद्याप हाती लागू शकली नाही.

‘Anarock’ च्या मते ह्या वर्षी तयार झालेल्या घरांच्या वाढत्या संख्येमागे अनेक मुख्य कारणे आहेत. यामध्ये संबंधित कायदा RERA, घरांच्या विक्रीतील वाढीदरम्यान उत्तम राहिलेला CASH FLOW, बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि वित्तीय संस्थांकडून वाढलेले कर्ज यांचा समावेश आहे. ‘Anarock’ कन्सल्टिंग फर्मने असे निदर्शनास आणले की बांधकाम व्यावसायिक प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण त्यामुळे खर्च वाढतो. ‘Anarock’ चे उपाध्यक्ष संतोष कुमार म्हणाले कि “ 2023 मध्ये भारतातील पहिल्या मुख्य सात शहरांमध्ये सुमारे 5.6 लाख घरे पूर्ण होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 39 टक्क्यांनी अधिक आहे.

दिल्ली-एनसीआरमधील घर खरेदीदारांना जास्तीत जास्त फायदा मिळेल

सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये यावर्षी सर्वाधिक घरे बांधली जातील, त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर)चा क्रमांक असेल. दिल्ली-एनसीआरमध्ये या वर्षी 1,70,100 घरांचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे, तिथे गेल्या वर्षी अंदाजे 86,300 घरे होती. MMR मध्ये 1,31,400 घरे बांधली जाण्याची अपेक्षा आहे, 2022 मध्ये 1,26,700 घरे बांधून पूर्ण झाली आहेत . पुण्यात किमान 98,400 घरांचे बांधकाम पूर्ण होऊ शकण्याची शक्यता ‘Anarock’वर्तवत आहे मागील वर्षी पुण्यात कमाल 84,200 घरे बांधण्यात आली होती . बेंगळुरूमध्ये या वर्षी 80,100 घरांचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षी अंदाजे 48,700 इतके होते.

वाढत्या विक्रीमुळे बिल्डरांनाही आनंद झाला

Antriksh India चे CMD राकेश यादव म्हणाले की, घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने विकासक उत्साहित आहेत. यामुळे प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घराच्या चाव्या खरेदीदारांच्या ताब्यात द्याव्यात, अशी विकासकांची इच्छा आहे. यासोबतच कामगारांची सहज होणारी उपलब्धता, हवामानाची परिस्थिती, अधिकार आणि अलीकडच्या काळात सरकारने घेतलेले पुढाकार यांचाही परिणाम घर उभारणीवर होतो.यासर्व गोष्टी एकसंधपणे घडून आल्याने प्रकल्पाच्या बांधकामाला वेग आला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याने विकासक आणि घर खरेदीदार दोघांनाही फायदा होत आहे . प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याने खर्चही कमी होईल, ज्यामुळे घर खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि म्हणूनच या क्षेत्रात आणखी मागणी वाढण्याची अपेक्षा नाकारता येत नाही.

इतर शहरांमध्येही बांधकामाचा वेग वाढला आहे

मागील वर्षी कोलकातामध्ये जिथे 23,200 घरे बांधण्यात आली होती तिथे या वर्षी 36,700 घरांचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हैदराबादमध्ये गतवर्षीच्या 11,700 युनिटच्या तुलनेत यावर्षी 23,800 घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या वर्षी चेन्नईमध्ये 17,400 घरांचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे, मागील वर्षी अंदाजे 21,200 घरे बांधण्यात आली होती.