Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच घर खरेदीदार अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी मध्ये सुद्धा अधिक रस दाखवत असल्यामुळे अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी च्या (Real Estate) दरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे डोकेदुखी ठरू शकते. माजिकब्रिक्स ने सादर केलेल्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे . नक्की काय आहे या अहवालात चला पाहूया…
या शहरांचा समावेश (Real Estate)
एप्रिल-जून 2024 च्या मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवालाने भारतातील टॉप 13 शहरांमधील बांधकामाधीन मालमत्तांच्या किमतींमध्ये तिमाही-दर-तिमाही (QoQ) 15 टक्के वाढ दर्शविली आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, ग्रा. नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, मुंबई, नवी मुंबई, नोएडा, पुणे आणि ठाणे. अशा शहरांचा समावेश आहे. या अहवालानुसार एप्रिल ते जून दरम्यान बांधकामाधीन मालमत्तांच्या पुरवठ्यात 11.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुरुग्राम, मुंबई, नोएडा आणि ठाणे यांसारख्या शहरांमधील बांधकामाधीन (Real Estate) मालमत्तांच्या किमती रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीपेक्षा जास्त झाल्या आहेत.
भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र सलग तिसऱ्या वर्षीही मजबूत (Real Estate)
याबाबत माहिती देताना मॅजिकब्रिक्सचे रिसर्च विभाग प्रमुख अभिषेक भद्रा यांनी या ट्रेंडवर भाष्य केले, ते म्हणाले, “जसे आम्ही 2024 मध्ये नेव्हिगेट करत आहोत, भारतीय रिअल इस्टेट मार्केटने मजबूत बुल रनच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. यावेळी पुरवठा कमी आणि मागणी जास्त. त्यामुळे बांधकामाधीन मालमत्तेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बांधकामाधीन मालमत्तेबाबत लोकांची भीतीही (Real Estate) दूर झाली आहे. सुमारे 2 कोटी ग्राहकांच्या पसंतींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
महागाई कमी झाली तरी घरांच्या मागणीत वाढ (Real Estate)
मॅजिक ब्रिक्सच्या अहवालानुसार उत्तर भारतातील गुरुग्राम दिल्ली आणि नोएडा या भागामध्ये सर्वाधिक डिमांड आहे. बँकांचे व्याजदर चढे असले तरीही घरांची डिमांड ही काही कमी नाहीये. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने यावेळी आठव्या वेळा रिपोरेट बदललेला नाही. त्यामुळे एकूणच मार्केटमध्ये स्थिरता असल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टनुसार जर महागाई कमी झाली तरी देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे स्वस्तातल्या घरांची सुद्धा डिमांड वाढणार आहे. शिवाय मोठ्या शहरांमध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची (Real Estate) शक्यता वर्तवण्यात आली आहे.