Realme C63 भारतात लाँच; किंमत 9000 पेक्षा कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C63 असे या मोबाईलचे नाव असून C सिरीज मधील हा नवीन मोबाईल आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि सर्वोत्तम फीचर्सने सुसज्ज असा हा स्मार्टफोन आहे. आज आपण Realme च्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.74 इंच डिस्प्ले –

Realme C63 मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1600 x 720 pixels रिझोल्युशन, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 450 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने Realme C63 मध्ये Unisock चा T612 ऑक्टाकोर प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 वर चालतो. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्मार्टफोन मध्ये मिळत असून SD कार्डद्वारे हे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Realme C63

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C63 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा आहे . पॉवरसाठी मोबाईलमध्ये 5 हजार mAh बॅटरी असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे.

किंमत किती?

रिअलमी C63 च्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 8999 रुपये आहे. हा मोबाईल लेदर ब्लू आणि जेड ग्रीन रंगात येते. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्री सुरू होईल. ग्राहक realme.com, Flipkart आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात.