हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme GT7 – रियलमीने आपल्या GT-Series अंतर्गत नवीन स्मार्टफोन Realme GT7 चीनमध्ये अधिकृतपणे लाँच केला आहे. या हँडसेटमध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत ज्यात 7200mAh ची दमदार बॅटरी, 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर, अन 16GB पर्यंत RAM यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन 6500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि AI सिग्नल ट्रॅकिंग तंत्रज्ञानासह येतो, ज्यामुळे याचे परफॉर्मन्स आणखी सुधारले आहे.
Realme GT7 चे फीचर्स –
Realme GT7 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन 2800×1280 पिक्सल्स इतके आहे. स्क्रीनमध्ये 2600Hz टच सॅम्पलिंग रेट आणि DC डिमिंगचा सपोर्टही आहे. हँडसेटमध्ये 3.73GHz ऑक्टा-कोर Dimensity 9400+ 3nm प्रोसेसर आणि Immortalis-G925 GPU दिला आहे. हा फोन 12GB/16GB रॅम आणि 256GB/512GB/1TB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सॉफ्टवेअरबाबत बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Android 15 आधारित Realme UI 6.0 वर चालतो. तसेच 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7200mAh बॅटरी यामध्ये दिली आहे. या फोनचा आकार 162.42×75.97×8.25mm असून वजन 203 ग्रॅम आहे.
कॅमेरा –
कॅमेऱ्याच्या बाबतीत, Realme GT7 मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा (f/1.8 अपर्चर व OIS सपोर्टसह), 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर, इन्फ्रारेड सेंसर, आणि IP68+IP69 प्रमाणपत्र दिलेले डस्ट व वॉटर रेसिस्टन्स देखील आहे.
कनेक्टिव्हिटी –
कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC आणि USB Type-C सारखे फीचर्स आहेत.
Realme GT7 किंमत –
हा स्मार्टफोन निळ्या , पांढऱ्या आणि काळ्या रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 2,599 युआन (सुमारे 30,400 रु ) आहे. 16GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटसाठी किंमत 2,899 युआन (33,900 रु ), तर 16GB + 512GB साठी 3,299 युआन (38,500 रु) आहे. टॉप व्हेरियंट, म्हणजेच 16GB RAM + 1TB स्टोरेजची किंमत 3,799 युआन (सुमारे 44,400 रु ) आहे. हा स्मार्टफोन 29 एप्रिलपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.