हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वस्तात मस्त मोबाईल साठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme NARZO 70 Turbo 5G असं या मोबाईलचे नाव असून सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा बजेट किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या मोबाईल मध्ये 50MP 50MP , 12GB रॅम सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. रिअलमी चा हा हँडसेट पिवळ्या, हिरव्या आणि पर्पल रंगात लाँच करण्यात आला असून येत्या 16 सप्टेंबर पासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत.
6.67-इंचाचा डिस्प्ले –
Realme NARZO 70 Turbo 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 180Hz टच सैंपलिंग रेट आणि 2 हजार nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. मोबिलबाबत खास बाब सांगायची झाल्यास यामध्ये रेन वॉटर स्मार्ट टचची सिस्टीम देण्यात आली आहे. म्हणजेच बोटे ओली असतानाही फोनचा डिस्प्ले तुम्ही हॅन्डल करू शकता. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक के डाइमेंसिटी 7300 Energy प्रोसेसर वापरला असून हा स्मार्टफोन Android 14 आधारित Realme UI 5 वर काम करतो . मोबाईलला IP65 रेटिंग मिळालं आहे, म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून कोणताही धोका नाही.
कॅमेरा – Realme NARZO 70 Turbo 5
Realme NARZO 70 Turbo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी वापरण्यात आली असून हि बॅटरी 45W अल्ट्रा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा मोबाईल फक्त 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Realme NARZO 70 Turbo 5G च्या 6GB + 128G स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये, 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 आणि 12GB + 256GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 18,999 रुपये आहे. ग्राहक येत्या १६ सप्टेंबर पासून Realme वेबसाइट आणि Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.