Realme Narzo N53 स्वस्तात लाँच; 5000mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा अन बरंच काही..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतात नवीन Realme Narzo N53 लॉन्च केला आहे. Narzo N53 हा कंपनीचा Narzo मालिकेतील “सर्वात Slim स्मार्टफोन” आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसालाही तो खरेदी करणं नक्कीच परवडणारे ठरू शकत. चला आज आपण Realme Narzo N53 चे खास फीचर्स जाणून घेऊयात….

Real me Narzo N 53 ला 6.72 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच स्क्रीन to बॉडी रेशो 90.3 आणि टच samplink रेट 180Hz इतका आहे. हा फोन Unisoc T 612 चीपसेट वर आधारीत असून याचे वजन 182 ग्राम आहे. हा फोन 4G इनबिल्ट असून Android 13 सिस्टमवर चालतो. Narzo सिरीज मधील सर्वात पातळ आणि स्टायलिश गोल्ड filament व कॅलिफोर्निया सनशाईन डिझाईन मध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Real me Narzo N53ला पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. या स्मार्टफोनमध्ये 33w फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000 mAh, बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत किती –

Realme Narzo N53 च्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईलच्या 4 RAM आणि 64 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 8,999 रुपये आहे तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 10999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक अश्या दोन रंगात उपलब्ध आहे.