Realme Neo 7x स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा!

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme ने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन ‘Realme Neo 7x’ लाँच केला आहे. या नवीन रियलमी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 चिपसेट, 12GB पर्यंत RAM आणि 6000mAh ची मोठी बॅटरी अन यासारखे आकर्षक फीचर्स दिले गेले आहेत. रियलमी नियो 7x मध्ये 50MP चा प्राथमिक रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

रियलमी नियो 7x चे फीचर्स –

नवीन रियलमी नियो 7x मध्ये 6.67 इंचाची फुल HD+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. ही स्क्रीन 1500Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि 2000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 प्रोसेसर, 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोन Android 15 आधारित Realme UI 6.0 सोबत येतो.

कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल OV50D40 प्राथमिक कॅमेरा आहे, आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयुक्त आहे. फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीसाठी, रियलमी नियो 7x मध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. सुरक्षा फीचर्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यामध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससाठी IP66, IP68 आणि 1969 रेटिंग्स आहेत. डिव्हाइसचे डायमेन्शन्स 163.15 x 75.65 x 7.97 मिमी आणि वजन 194 ग्राम आहे.

किंमत –

रियलमी नियो 7x च्या 8GB RAM व 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 1,299 युआन (सुमारे 15,600 रुपये) आहे. तर 12GB RAM आणि 512GB स्टोरेज वेरियंटची किंमत 1,599 युआन (सुमारे 19,200 रुपये) आहे. हे स्मार्टफोन सध्या चीनमधील रियलमी चायना इ-स्टोअर आणि अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.