हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme P3 Ultra – Realme ने भारतात त्याच्या P3-सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme P3 Ultra हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 6.83 इंच डिस्प्ले, 14GB पर्यंत वर्चुअल रॅम आणि 50MP प्रायमरी रियर कॅमेरा सारखे फीचर्स दिले गेले आहेत. रियलमीचा हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह येतो. तर चला जाणून घेऊयात रियलमी P3 Ultra स्मार्टफोनमधील फीचर्स अन , किंमतबद्दलची सर्व माहिती.
Realme P3 Ultra स्पेसिफिकेशन्स –
रियलमी P3 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.83 इंच (2800 x 1272 पिक्सल) 1.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर डाइमेन्सिटी 8350 4n प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G615 MC6 GPU उपलब्ध आहे. तसेच 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. फोनमध्ये 14GB पर्यंत वर्चुअल रॅम ऑप्शन उपलब्ध आहे. डिव्हाइस ड्युअल सिम सपोर्टसह येते आणि Android 15 आधारित realme UI 6.0 ऑपरेटिंग सिस्टम वापरते.
कॅमेरा (Realme P3 Ultra)-
या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा आहे, जो f/1.8 ऍपर्चर आणि OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सपोर्टसह येतो. त्याचबरोबर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा (f/2.2) आणि LED फ्लॅश दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (f/2.45 ऍपर्चर ) आहे. डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी –
रियलमी P3 Ultra स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 80W Super VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11AX, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतात. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये USB Type-C ऑडियो, स्टीरियो स्पीकर्स आणि Hi-Res Audio सपोर्ट देखील आहे. डिव्हाइस IP66, IP68 आणि IP69 प्रमाणित डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे. तसेच स्मार्टफोनचे डायमेंशन्स 163.10×76.90×7.38 मिमी आहेत, आणि वजन 183 ग्राम आहे.
किंमत आणि बँक ऑफर –
Realme P3 Ultra 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपये किंमतीत मिळेल. रियलमीच्या या स्मार्टफोनचे प्री-ऑर्डर रियलमीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर आजपासून उपलब्ध होईल. लाँच ऑफर्समध्ये 3000 रुपये बँक ऑफर आणि 1000 रुपये अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिले जात आहेत. याशिवाय, 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI ऑफरही उपलब्ध आहे. स्मार्टफोनवर एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी देखील दिली जात आहे.