हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans- रिलायन्स जिओ आणि एअरटेलने स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किमतीती अधिक सेवा मिळणार आहेत. तसेच हा प्लॅन अशा ग्राहकांना देखील फायदेशीर आहे, जे चित्रपट आणि वेब सिरीज पाहतात. रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये स्वस्त OTT सब्स्क्रिप्शन सुविधा दिली आहे. ज्यामुळे ग्राहकांना जास्त फायदा होणार आहे. तर चला या प्लॅनबदल (Recharge Plans) अधिक माहिती जाणून घेऊयात.
जिओचा 175 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Recharge Plans) –
रिलायन्स जिओने 175 रुपयांमध्ये एक नवा OTT प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये 10 जीबी हाय स्पीड डेटा आणि 10 प्रमुख OTT अँपचे मोफत ऍक्सेस दिला जातो. यामध्ये सोनी लाईव्ह, झी 5, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल आणि होईचोई यांचा समावेश आहे. हे सर्व अँप्स 28 दिवसांसाठी मोफत वापरता येतील.
तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियमचा 28 दिवसांचा सब्स्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाऊंटमध्ये मिळेल. बाकी अँप्स तुम्ही जिओ टीव्ही मोबाईल अँपद्वारे ऍक्सेस करू शकता. मात्र, या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस सुविधांचा लाभ मिळणार नाही. या प्लॅनचा व्हॅलिडिटी कालावधी 28 दिवसांचा आहे.
एअरटेलचा 181 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
एअरटेलनेही (Recharge Plans)181 रुपयांचा OTT प्लॅन आणला आहे. यामध्ये 15 जीबी हाय स्पीड डेटा आणि 22 OTT अँप्स मोफत वापर मिळतो. यामध्ये सोनी लाईव्ह, लायन्सगेट प्ले, आहा, चौपाल, होईचोई आणि सन नेक्स्ट सारखी प्रमुख अँप्स समाविष्ट आहेत. या प्लॅनचा व्हॅलिडिटी कालावधी 30 दिवसांचा आहे, त्यामुळे तुम्ही 30 दिवसांसाठी 22 ओटीटी अँप्स आणि 15 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा घेऊ शकता.
प्लॅन्स तुमच्यासाठी खास –
रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी OTT प्लॅन्स आणले आहेत, जे स्वस्त असून, विविध OTT अँप्सचा लाभ घेण्यासाठी आदर्श ठरू शकतात. ओटीटी कंटेंटच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, या प्लॅन्समुळे युजर्सना उत्तम एंटरटेनमेंट अनुभव मिळणार आहे. त्यामुळे हे प्लॅन्स तुमच्यासाठी खास ठरू शकतो.




