हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक घरोघरी फॅन, कुलर, एसीचा वापर केला जात आहे. या कारणामुळेच गुरुवारी महावितरणने 23 हजार 571 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे भारनियमन टाळलं आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 43 ते 44 अंशांवर आहे. अशा परिस्थितीत लोकांची गरज लक्षात घेऊन महावितरणने अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राला वीज पुरवली आहे.
सध्या राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये भयानक उष्णता जाणवत आहेत. त्यामुळे लोक घराच्या बाहेर पडण्याऐवजी घरातच राहावे निवडत आहेत. यात गरमाई पासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एसी कुलर फॅनचा वापर केला जात आहे. तसेच थंडगार पेयांसाठी सर्वांत जास्त फ्रीज वापरले जात आहेत. थोडक्यात अशा विविध कारणांमुळे विजेची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणाने इतर वीज कंपन्यांकडून वीज खरेदी केली आहे.
मात्र दुसऱ्या बाजूलाही विजेची मागणी वाढल्यामुळे राज्याला लोड शेडिंगचा ही सामना करावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण की, कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी त्यामुळे महावितरणावर अधिक भार आला आहे. या दोन दिवसाच्या काळामध्ये म्हणजेच 21 मे रोजी 24 हजार 418 मेगावॅट, 22 मे रोजी 24 हजार 604 मेगावॅट, 23 मे रोजी 23 हजार 579 मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला आहे. आता विजेची ही मागणी आणखीन वाढेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता महावितरणाने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांचा वेग वाढवला आहे.