Job Requirement| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण की, पुण्यातील नामांकित एअर फोर्स स्कूलमध्ये (Air Force School) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत अकाउंट असिस्टंट आणि मदतनीस अशा दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत . इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेची माहिती (Job Requirement)
या भरतीअंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यात प्रत्यक्ष नोकरी करावी लागेल. सुरुवातीला निवड प्रक्रियेमध्ये उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर भर दिला जाणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी www.airforceschoolpune.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. महत्वाचे म्हणजे, (Job Requirement) इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता व अटींची माहिती वेबसाईटवरून तपासून लवकरात लवकर अर्ज करावा.