नोकरीची सुवर्णसंधी! पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1,154 रिक्त पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

0
1
indian railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वेमध्ये (Indian Railway) काम करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता पूर्व मध्य रेल्वेमध्ये (ECR) अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. रेल्वे भरती कक्षाने (RRC) या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1,154 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

कोणत्या जागा भरल्या जाणार?

दानापूर विभाग – 675

धनबाद विभाग – 156

पं. दीनदयाळ उपाध्याय स्थानक (मुगलसराई) – 64

सोनपूर विभाग – 47

समस्तीपूर विभाग – 46

प्लांट डेपो (पं. दीनदयाळ उपाध्याय) – 29

हरनौट वाहन दुरुस्ती कार्यशाळा – 110

मेकॅनिकल फॅक्टरी, समस्तीपूर – 27

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यासह 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे, एससी/एसटीसाठी 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे वयाची सूट देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण

अप्रेंटिस पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड पूर्णपणे गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाणार आहे. उमेदवाराच्या दहावी आणि आयटीआय परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेच्या नियमांनुसार निश्चित मानधन दिले जाईल.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

अर्ज करताना दहावीचे गुणपत्रक, आयटीआय प्रमाणपत्र, जन्मदाखला आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) अपलोड करावे.

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 100 अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.

अर्जाची अंतिम तारीख

अर्ज करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.