हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भरतीसाठी (Agnivir Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया 8 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार 20 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. आताच्या घडीला जे तरुण सैन्यात भरती होण्याची इच्छा बाळगता त्यांच्यासाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते.
पात्रता आणि वयोमर्यादा
अग्निवीर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ठरवलेली पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
- अर्जदाराचे वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असावे.
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- शारीरिक व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरणे आवश्यक आहे.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- 10वीच्या गुणपत्रिकेत नमूद केलेले नाव, पालकांची नावे आणि पत्ता, अर्जातील तपशीलाशी जुळणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.
- फॉर्म भरताना योग्य ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर रजिस्टर करणे गरजेचे आहे.
अर्जदारांसाठी महत्त्वाचे निर्देश
वाराणसी कॅन्टोन्मेंटमधील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसचे संचालक कर्नल शैलेश कुमार यांनी उमेदवारांना भरती प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळ Joinindianarmy.nic.in वर भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज काळजीपूर्वक भरावा. तसेच, भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या भरतीचा अधिक लाभ घ्यावा.