हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून ती 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालू आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
भरती प्रक्रिया आणि पदे
मिळालेल्या माहितीनुसार, PGT आणि TGT शिक्षक, मुख्य विधी सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक हिंदी, प्राथमिक रेल्वे शिक्षक यांसह इतर विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. प्रमुख पदांमध्ये PGT शिक्षकांसाठी 187, TGT शिक्षकांसाठी 338, आणि कनिष्ठ अनुवादक हिंदीसाठी 130 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार 12वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अध्यापनाशी संबंधित पदांसाठी B.Ed, D.El.Ed किंवा TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे असून, कमाल वयोमर्यादा 33 ते 48 वर्षे ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करताना श्रेणीनुसार शुल्क जमा करणे बंधनकारक आहे. सामान्य, OBC, आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 500 रुपये, तर SC, ST, महिला, PWD, आणि माजी सैनिकांसाठी 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.