हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCFL) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना २१ मार्च २०२५ पासून अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल २०२५ आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध तांत्रिक आणि सहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित आपले अर्ज दाखल करावे.
रिक्त पदांची माहिती
या भरतीअंतर्गत Operator Trainee (Chemical) साठी ५४ जागा, Technician (Mechanical) Trainee साठी ८ जागा, Technician Trainee (Instrumentation) साठी ४ जागा, Boiler Operator Grade III साठी ३ जागा, Junior Fireman Grade II आणि Technician (Electrical) Trainee साठी प्रत्येकी २ जागा तर Nurse Grade II साठी १ जागा भरली जाणार आहे.
अर्ज शुल्क
RCFL ने अर्ज शुल्कासंबंधी काही सवलती जाहीर केल्या आहेत. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही. मात्र, OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गातील उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागेल.
शैक्षणिक पात्रता
▪ Operator Trainee (Chemical): उमेदवारांकडे B.Sc. (Chemistry) पदवी किंवा NCVT AO(CP) ट्रेड प्रमाणपत्र असावे, अथवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे.
▪ Boiler Operator Grade III: उमेदवाराने SSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे Second Class Boiler Attendant Certificate तसेच किमान २ वर्षांचा अनुभव असावा.
▪ Junior Fireman Grade II: उमेदवाराने SSC परीक्षा उत्तीर्ण असावी, फायरमन प्रमाणपत्र धारक असावा, त्याचबरोबर Heavy Vehicle Driving License आणि १ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪ Nurse Grade II: उमेदवाराने B.Sc. Nursing किंवा GNM कोर्स पूर्ण केलेला असावा आणि त्याला २ वर्षांचा हॉस्पिटलमध्ये अनुभव असावा.
वयोमर्यादा
भरतीसाठी ठरवलेल्या वयोमर्यादेनुसार, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ३५ वर्षे आणि OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गासाठी ३३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, RCFL मध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. तसेच, इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेला विलंब न लावता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.