औरंगाबाद । कोरोनामुळे वैद्यकीय विभागाचे महत्व समजत आहे. वैद्यकीय विभागाला सक्षम करण्यासाठी आता संपूर्ण देशभरात हालचाली सुरु झाल्या आहेत. याच प्रमाणे औरंगाबाद शहरात दोन हजार शासकीय रुगणालयाच्या जागा भरण्याचा निर्णय स्थानीय प्रशासनाने घेतला होता. त्या भरतीचे नियोजन, भरतीची वेळमर्यादित केली नव्हती.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकदे दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज सायंकाळी साडेचार वाजे पर्यंत शासकीय रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासाठी तपशीलवार वेळापत्रक सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर सरकारी वकिलाने येत्या तीन महिण्यात ५० टक्के जागा भरण्याची माहिती न्यायालयाला दिली.
सरकारी वकिलांच्या या वक्तव्यावर उच्च न्यायालयाने येत्या एक आठवड्यात या जागा भरण्यास सुरु करावी आणि येत्या आठ आठवड्यात या जागा भराव्या असे आदेश सरकारला दिले. हि संपूर्ण माहिती औरंगाबादचे खासदार आणि या प्रकरणातील याचिका करते इम्तियाज जलील त्यांनी दिली.