टेक महिंद्रामध्ये 6 हजार रिक्त पदांची भरती; फ्रेशर्सला दिली जाणार नोकरीची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IT क्षेत्रात (IT Sector) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या काळात आयटी क्षेत्रात नावाजलेले असलेल्या टेक महिंद्रामध्ये (Tech Mahindra) फ्रेशरची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती टेक महिंद्राच्या पुणे-मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच, 2023-24 वर्षात पदवी बाहेर घेऊन पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

6,000 पदांसाठी होणार भरती

मिळालेल्या माहितीनुसार, टेक महिंद्रामध्ये 6,000 नवीन फ्रेशर्सची भरती करण्यात येईल. ही भरती महिंद्रामध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी करण्यात येईल. त्यामुळे पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना नोकरीसाठी नवा मार्ग मिळेल. महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी सांगितले आहे की, दर तिमाहीत कंपनी 1,500 अधिक नवीन कामगारांना नोकरीची संधी देत असते. या वर्षात आम्ही 50000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण आहोत.

सध्या टेक महिंद्रा कंपनी आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत महिंद्रामध्ये 6,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यापूर्वी देखील महिंद्रा मध्ये मोठी नोकर भरती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कंपनीने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.